Breaking News

ऑक्सिजन पुरवठ्यात कोणी अडथळा आणत असेल तर थेट फासावर लटकवा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 25, 2021 5:40 pm
|

नवी दिल्ली : केंद्र, राज्य अथवा स्थानिक प्रशासनाचा कोणताही अधिकारी ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये अडथळे आणत असेल तर आम्ही त्याला थेट फासावर चढवू असे खडे बोल उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. आयआयटी दिल्लीच्या अंदाजानुसार मे महिन्याच्या मध्यावधीत कोरोनाचा संसर्ग आणखी तीव्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. ही लाट नाही तर सुनामी असेल. आता या महासंकटाचा सामना करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी विचारणा देखील न्यायालयाने दिल्ली सरकारला केली आहे.

कोरोनाकाळात देशविरोधी शक्तींपासून सावध राहा, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचे आवाहन
ऑक्सिजनचा पुरवठा कोण रोखतेय ते आम्हाला दाखवून द्या आम्ही त्याला थेट फासावर देऊ. याबाबतीत कोणावर देखील दयामाया दाखविली जाणार नाही. दिल्ली सरकारने देखील स्थानिक प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांची नावे केंद्राला कळवावीत तसे केल्याने या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करणे अधिक सोपे होईल, असेही न्यायालयाने नमूद केले.

केंद्राने दिल्लीला प्रतिदिन ४८० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आश्वारसन दिले आहे. हा ऑक्सिजन कधी येणार? याची माहिती आम्हाला देण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.

येथील महाराजा अग्रसेन रुग्णालयाने ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्या. विपिन संघई आणि न्या रेखा पल्ली यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 25, 2021, 5:40 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *