‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय’, आनंद शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांना गाण्याच्या माध्यमातून टोला
मंगळवेढा –पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकार करण्यासाठी विविध पध्दतींचा वापर केला जात आहे. आता तर थेट ज्येष्ठ पार्श्वगायक आनंद शिंदेंच्या गाण्यातून राष्ट्रवादीचा चांगलाच प्रचार झाला आहे. आनंदर शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना गाण्याच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारच्या प्रचारसभांमध्ये सत्ता बदलाविषयी वक्तव्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या “या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,” या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पसरलेल्या अस्वस्थतेचे दर्शन कालच्या मंगळवेढ्याच्या सभेत पडलेले दिसले. राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेले गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना गाण्यातून प्रत्युत्तर देताना त्यांचा बाप काढला…!!
पण त्याच वेळी हे पवार साहेबांचे सरकार आहे, अशी दर्पोक्ती करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही “कोलले.” भगीरथ भालके यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते
सरकार की बदलायचे माझ्यावर सोडा, पण सरकारला जागा दाखवून देण्याची संधी, देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवेढ्यात इशारा आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘त्यांना सांगायचंय मला’ असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला.
तुम्ही चिडवताय,
आम्ही चिडणार नाय.
तुम्ही लय काय करताय,
तसं काय घडणार नाय.
तुम्ही रडवताय
पण आम्ही रडणार नाय.
हे पवार साहेबांचं सरकार हाय,
तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय.
आनंद शिंदे यांच्या भाषणाला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यावेळी रोहित पवार व्यासपीठावर हजर होते.राष्ट्रवादीच्या सभेत अशी बाप काढण्याची भाषा काही पहिल्यांदाच झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील सक्षणा सलगर या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सोलापूरमध्येच ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मोदी – फडणवीसांच्या बद्दल असेच असभ्य उद्गार काढले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 13, 2021, 4:14 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY