अन्नदाता आणि जीवनदाता तुमच्या कार्याला सलाम’, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं भावनिक पत्र
आपल्या जिवाची बाजी लावून दुसऱ्याच्या प्राणाचे रक्षण करतो त्याच्या जीविताची हानी होईल असे कृत्य कोणीही करु नये
मुंबई : आज महाराष्ट्रात राष्ट्रीय डॉक्टर दिन आणि कृषी दिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्र लिहून डॉक्टर आणि शेतकऱ्यांचं आभार व्यक्त केले आहेत. डॉक्टरांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यास आपले शब्द कमी असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.
देशातील प्रसिद्ध चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी असल्याने भारतात 1 जुलै रोजी राष्ट्रीय चिकित्सक दिवस साजरा केला जातो. तर राज्यात दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 1 जुलैला कृषी दिवस साजरा करण्यात येतो. कृषी दिवस हा कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांनी कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मानार्थ कृषी दिवस साजरा केला जातो. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या आभार पत्रात अन्नदाता आणि जीवनदाता यांचे आभार मानले आहेत. या दोघांमुळे कोरोना सारखं संकट सुसह्य झाले आहे, त्याच्या कार्याचं कौतुक करावे तितके थोडे, कोरोनाच्या या कठीण काळात अन्नदाता शेतकरी आणि जीवनदाता डॉक्टर यांच्या कष्टामुळे सर्वसामान्यांना हा कठीण काळ सुसह्य होण्यासाठी मोठी मदत मिळाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सोबतच बळीराजालाही मी शतशः धन्यवाद देतो डॉक्टरांचा असा एक दिवस असू नये, कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोज आपल्याला हवा असतो… असल्याचं टोपे पत्रात म्हणाले आहेत.
दरम्यान डॉक्टरांचे फक्त आजच आभार मानू काही उपयोग नाही, देवाचा एक दिवस नसतो देव आपल्याला रोजच हवा असतो. त्यामुळे आपण डॉक्टरांचं रोज आभार मानले पाहिजे. पण एखाद्या वेळी माणूसरुपी देवाकडून प्रयत्न करुनही प्राण वाचवले गेले नाहीतर त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून दम दिला जातो, अशी खंत ही टोपे यांनी आपल्या पत्रातून बोलून दाखवली आहे. राजेश टोपे यांनी आपल्या पत्रात म्हणालेत की, ‘यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर गेला आहे… याकामी डॉक्टर्स त्यांच्या जोडीला असलेल्या नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे… आजच्या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व डॉक्टरांना मी पुन्हा एकदा खूप सार्या शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो
राजेश टोपे यांचे पत्र
आपण जीवनदाते आहात मात्र काही वेळा नातेवाईकांकडून भावाना अनावरण झाल्यास आपल्यावर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटना घडतात. त्याचे समर्थन नक्कीच होणार नाही, अशा घटना निंदनीयच आहेत. जो आपल्या जिवाची बाजी लावून दुसऱ्याच्या प्राणाचे रक्षण करतो त्याच्या जीविताची हानी होईल असे कृत्य कोणीही करु नये’, असे आवाहन त्यांनी आपल्या पत्रात केले आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 1, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 1, 2021, 4:46 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY