Breaking News

महाराष्ट्रातील कडक लॉकडाऊन संदर्भात आज निर्णय होणार,बोलवली आज सर्वपक्षीय बैठक

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 10, 2021 1:39 pm
|

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात चर्चा केली जाणार आहे.आजच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांविषयी धोरण स्पष्ट होऊ शकते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत राज्यात तीन आठवड्याच्या लॉकडाऊन लावायचा की नाही यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच जर हा लॉकडाऊन लावण्यात आला तर मग नियमावली गाईडलाईन्स कशा प्रकारे करायच्या, याबद्दल या बैठकीत चर्चा होऊ शकते.तसेच राज्यात मिनी लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेने दिला आहे. निर्बंधांमुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे संघटनेने सांगितले. यामुळे बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 10, 2021, 1:39 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *