Breaking News

अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट, म्हणाल्या- देखें अबके किसका नंबर आता है !’

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 17, 2021 7:56 pm
|

मुंबई: अमृता फडणवीस यांनी यांनी सोमवारी एक ट्विट केलंय त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे . अरबी समुद्रात ‘तौकते’ नावाचे चक्रीवादळ तयार होत असून मुंबईत सोमवारी पहाटेपासून चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले.मात्र त्या ट्विटचा राजकीय अर्थ देखील काढला जातोय

‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार, असे काही प्रश्न अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे उपस्थित झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. “पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही महामारी का कहर उससे सम्हलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?”, असं ट्विट अमृता यांनी केले होते.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 17, 2021, 7:56 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *