तन्मय फडणवीस लसीकरण वाद; देवेंद् फडणवीसांनी हात झटकले तर अमृता फडणवीस म्हणतात;…
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा पुतण्या तन्मय फडणवीस (Tanmay Fadanvis) याने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतला. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यानंतर नियमबाह्य लसीकरणावरुन सध्या राज्याच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांचा नातू असलेला तन्मय हा आपला दूरचा नातेवाईक असल्याचे म्हणून फडणवीसांनी या प्रकरणातून हात झटकले आहेत. आता या सगळ्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही उडी घेतली आहे.
तन्मय फडणवीस यानं लस घेतल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या केवळ ४५ वर्षे वयावरील व्यक्तींना, फ्रंटलाइन वर्कर्सना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. तन्मयला यापैकी कोणत्या निकषावर लस दिली गेली, असा प्रश्न विचारला जात आहे. हा सगळा वाद सुरु असताना अमृता फडणवीस यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.
शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी तन्मय फडणवीसच्या लसीकरणावरुन याला म्हणतात विशेषाधिकार, असा टोला लगावला होता. चतुर्वेदी यांच्या ट्वीटला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. नियम आणि कायद्याच्यावर कोणीही नाही. कायदा आपले काम करु शकतो आणि आम्ही न्यायासाठी नेहमीच उभे आहोत. या प्रकरणी आम्ही तुमच्यासोबत आहोत. जे लोकं नियमांविरुद्ध रांगेत उभे आहेत त्यांच्यावर कारवाई करा, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान , तन्मयला 45 वर्षे पूर्ण आहेत का ? तो फ्रंट लाईन वर्कर आहे का ? तो आरोग्य कर्मचारी आहे का ? असा प्रश्न यानिमित्ताने सोशल मीडियावरील युजर्स आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केलाय. या वादानंतर तन्मयने ही पोस्ट डिलीट केली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 21, 2021, 2:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY