Breaking News

अमृता फडणवीस म्हणाल्या, हो, मी भक्त आणि ‘गर्व आहे मला भक्त असल्याचा’

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 29, 2021 5:40 pm
|

मुंबई : देशातील लसीकरणाने ३२ कोटींचा टप्पा ओलांडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्व मंत्र्यांनी ही आकडेवारी ट्विट केली आहे. २१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढत आहे. पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून लसीकरणाचा वेग वाढला आहे. हिच आकडेवारी ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हो, मी भक्त आणि त्याचा मला अभिमान आहे, असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी देखील ट्विट करत सवार्ना मोफत लस देण्यात येणार असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येत आहे! ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत अशा सर्वांचे अभिनंदन. सर्वांसाठी मोफत लस हे आमचे वचन कायम आहे. सर्वांना लस, मोफत लस असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले होते. दरम्यान, भारतानं आता लसीकरणात अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. त्यामुळे आता भारत जगात सर्वात जास्त लसीकरण पूर्ण करणारा देश ठरला आहे. याचा अभिमान अमृता फडणवीसांना आहे म्हणून त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक (३२,३६,६३,२९७) लसीचे डोस देण्यात आले आहेत. दुसºया क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत आजपर्यंत सर्व प्रकारच्या लसींचे मिळून ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ ब्रिटन (७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९०), जर्मनी (७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४), फ्रान्स (५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८) आणि इटली (४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१) या देशांचा क्रमांक लागतो.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 29, 2021, 5:40 pm
Tags: Tags: , ,
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *