Breaking News

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत ;अकेरळसह महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा – IMD

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 11, 2021 4:29 pm
|

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यासह पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानंतर मुंबई हवामान विभागाचे संचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी नुकतंच एक ट्विट करून भारतात 15 मे च्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता वर्तविली आहे. पुढील काही दिवसांट हे चक्रीवादळ पश्चिम किनार्‍याला धडकण्याची शक्यता आहे. IMD च्या अंदाजानुसार दक्षिण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि यामधून समुद्रात Tauktae चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते.

भारतीय हवामान खात्याचे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा परिणाम भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसणार आहे. यामध्ये 14 मे रात्री पासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या भागांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सध्या मच्छिमारांना व बोटींना देखील परतण्यासाठी इशारे देण्यार आल्याचे सांगितले आहे. या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मच्छिमार्‍यांनी देखील 12 मे च्या रात्री पर्यंत परतण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मात्र भारतीय हवामान खातं सध्या या चक्रीवादळाच्या प्रवासावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.

यंदा भारतामध्ये 1 जूनला वेळेत मान्सून दाखल होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार 1 जूनला तो केरळमध्ये येण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 11, 2021, 4:29 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *