जरंडेश्वर साखर कारखान्यावरील ईडी कारवाईवर अजित पवार म्हणाले – ‘चौकशी करण्याचा संपूर्ण अधिकार’
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. राज्यातील आणि पुण्यातील कोरोना (Corona) परिस्थितीसंदर्भातही काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यावेळी मांडले. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) निकटवर्तीयांचा साखर कारखाना सील करण्यात आल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री झाली आहे.
ईडीकडून गुरु कमोडिटी बाबत चौकशी सुरु आहे. त्यामध्ये कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असल्याने ही कारवाई झाली आहे. कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असला तरी जरंडेश्वर शुगर मिल चालवत आहे. ईडीला चौकशीचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी देखील CID आणि ACB ने चौकशी केली आहे पण त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे जाणार आहे. अनेक शेतकरी आणि आणि कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. असे देखील यावेळेस अजित पवारांनी बोलताना म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असलेल्या शालिनीताई पाटील यांनी सांगितले की आमच्या कारखान्याचा कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी थोडा उशीर झाला होता. केवळ तीन कोटींचा हफ्ता शिल्लक असताना त्यांनी कारखाना विकला. आमच्या कारखान्याचं त्यांच्याकडे जे अकाऊंट आहे
जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून कारखाना बळकावल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, त्या खात्यात ८ कोटी ३४ लाख जमा होते. ते पैसे वळवण्यास सांगितलं असता दुर्लक्ष करण्यात आलं. सरकारची आमच्या कर्जाला हमी होती. त्यामुळे सरकारकडे जाता आलं असतं. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. विचारणारं कोणी नव्हतं. त्यांनी सत्तेचा पुरेपूर गैरफायदा केला आणि २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार अजित पवारांच्या काळात झाला. शालिनीताई म्हणाल्या,थोडा उशीर झाला पण आता ईडीने कारवाई केली असून आम्हाला न्याय मिळाला आहे. वास्तविक २०१९ मध्ये अण्णा हजारे, माणिकराव जाधव, अरोरा आणि मी अशा चार जणांनी अर्ज केला होता. अरोरा यांनी नंतर माघार घेतली. २०१९ मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी ईडीने एफआयआर दाखल करुन घेतला होता. पण काहीच कारवाई न झाल्याने दुसरा अर्ज करण्यात आला. त्याला ईडीने आम्हाला पाठिंबा दिला. भ्रष्टाचार झाला असल्याचं त्यांनी मान्य केलं. २७ हजार सभासदांना न्याय मिळाला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 2, 2021, 4:03 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY