‘संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल’, अजित पवारांकडून राज्यभरात कडक लॉकडाऊनचे संकेत?
बारामती: बारामती शहरात (Baramati News) आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनासंदर्भात तातडीची बैठक बोलावली होती . या बैठकीत राज्यामध्ये होत असलेला लसीचा तुटवडा तसेच रेमडेसिवीर या इंजेक्शन (Remdesivir dose for covid) संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याबाबत जिल्ह्याचे सीईओ आयुष प्रसाद यांनी बैठकीनंतर माहिती दिली. मात्र ही बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनबाबत (Lockdown) महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नसेल, राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाईल असं अजित पवारांनी सांगितलं.
“आज पुण्यात बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही. आज बारामतीत बैठक घेऊन इंजक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला. बारामतीत होत असलेली वाढ रोखण्यासाठी काही निर्बंध लादण्याबद्दल पोलिस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.” असं अजित पवार म्हणाले.
आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करुन त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 10, 2021, 2:58 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY