Breaking News

नागपूरमध्ये रुग्णालयात अग्नितांडव; 4 रुग्णांचा मृत्यू तर दोन जणांची प्रकृती गंभीर

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 10, 2021 11:08 am
|

नागपूर: मुंबईतील रुग्णालयातील आग दुर्घटना ताजी असतानाच नागपूरमधील वाडी भागात कोविड रुग्णालयात आगीचा भडका उडाला आहे. या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून मृतांमध्ये पुरुष व महिलेचा समावेश तर दोन जणांची असून प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात एकूण ३१ रुग्ण दाखल होते. रुग्णांना बाहेर काढताना रुग्णालयातील तीन कर्मचारी जखमी झाले असून, हॉस्पिटलमधील २७ रुग्णांना तातडीने अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले. अग्नीशमन दलाचे पथक आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. .कोविड रुग्णालयातून तीन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणले गेले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली आहे. तर संबंधित रुग्णालयातून २७ रुग्णांना बाहेर काढण्यात आले असून अन्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे,

वाडी परिसरात डॉ. राहुल ठवरे यांचं चार मजली रुग्णालय असून, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर रुग्णालय आहे. दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभाग आहे. या विभागात १० रुग्ण होते. अतिदक्षता विभागातील वातानुकूलन यंत्रात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे लक्षात येताच तेथील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर सहा रुग्ण स्वतःहून बाहेर आले. परंतु, जे तीन रुग्ण गंभीर होते त्यांना बेडवरून हलता आले नाही. यात एकाचा घटनास्थळीच, तर दोघांचा दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. या रुग्णालयात संध्याकाळी ६ वाजताच दगावलेल्या एका रुग्णाचा मृतदेहही या घटनेत जळाला आहे.या प्रकरणी आग नियंत्रणात आणल्यानंतर चौकशी होईल, असे संकेत स्थानिक पोलिसांनी दिले.दुसरीकडे पालकमंत्री नितीन राऊत, मंत्री सुनील केदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत ट्वीट केले आहे. नागपुरातील वाडी येथे एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना कळली. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांशी या घटनेसंदर्भात चर्चा केली असून सर्वती मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी मी प्रार्थना करतो, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 10, 2021, 11:08 am
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *