पावसाचे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला कामाचा आढावा
मुंबई: पावसाचे अधिकचे पाणी साठवण्यासाठी परळ येथील झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी तयार होत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
मुंबईची भौगोलिक स्थिती आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे थोड्या कालावधीत होणारा प्रचंड पाऊस लक्षात घेता सखल भागात पाणी साचून समस्या निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून अधिक पावसाच्या वेळी दोन्ही टाक्यांमध्ये हिंदमाता परिसरात साचणारे पाणी पंपांच्या साहाय्याने आणून साठवले जाणार आहे. यामुळे हिंदमाता परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने निर्माण होणारी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.कलापार्कच्या सुशोभिकरण व विकासकामासंदर्भात आराखड्याचेही यावेळी श्री. ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण देखील करण्यात आले.या वेळी खासदार अरविंद सावंत, नगरसेवक श्रीमती विशाखा राऊत, प्रीती पाटणकर, उर्मिला पांचाळ, समाधान सरवणकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त श्री.बल्लमवार, सहायक आयुक्त किरण दिघावकर, शरद उघडे आदी उपस्थित होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 4, 2021, 8:18 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY