अभिनेता वीरा साथीदार यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन; ‘कोर्ट’ चित्रटात बजावली होती दमदार भूमिका
नागपुर मधील विचारवंत, लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी मध्यरात्री वीरा साथीदार यांनी अखेरचा श्वास घेतला.काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे निधन ( Actor Veera Sathidar Passes Away) झाले. वीरा साथीदार यांच्या निधनामुळे एक बहुआयामी अभिनेता, विचारवंत आणि आंबेडकरी चळवळीतील आधारस्तंभ कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.
अभिनेता विरा साथीदार हे कोर्ट चित्रपटामुळे अनेकांपर्यंत पोहोचले होते. मात्र, केवळ अभिनेते अशीच त्यांची ओळख नव्हती. त्याही आधी ते नागपूर येथील प्रसिद्ध विचारवंत, लेख आणि आंबेडकरी चळवळीतील प्रमुख लढवय्ये म्हणून सर्वांना परिचीत होते. आंबेडकरी चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कोर्ट चित्रपटात वीरा साथीदार यांनी साकारलेल्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. राष्ट्रीय पुरस्कारानेही या चित्रपटाला गौरविण्यात आले.
वीरा साथिदार यांच्याविषयी थोडक्यात
वीरा साथीदार हे मूळ वर्धा जिल्ह्यातील होती. मात्र नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीमध्ये त्यांचे बालपण गेले, तिथेच ते मोठे झाले. घरी अठरा विश्व दारिद्र असतानाही त्यांच्या आईने त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचे वडील नागपूरच्या रेल्वे स्थानकावर हमाली, तर आई बांधकाम मजूर म्हणून काम करायच्या.सुरुवातीच्या काळात ते मेंढपाळ म्हणून काम करत होते.दरम्यानच्या काळात त्यांना लोकसंगीत आणि लोकसाहित्याची गोडी लागली. चित्रकला आणि शिल्पकलेसह साहित्यातही वीरा साथिदार यांनी जोरदार मुशाफीरी केली आहे. ते एक कवी आणि गायक म्हणूनही लोकांना परिचीत होते. ते ‘विद्रोही’ या मराठी मासिकाचे संपादक आणि लोकशाही हक्क कार्यकर्ते होते.
वीरा साथीदार यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा आधारस्तंभ हरपला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदारांवर जबरदस्त पगडा होता. त्यांनी आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही गायली आहे. अनेक ठिकाणी ते या विषयावर व्याख्यानही देत असत.त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले आहे. हे करत असताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 13, 2021, 4:23 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY