Breaking News

ट्विटरकडून राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांची खाती अनलॉक

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 14, 2021 1:52 pm
|

ट्विटरने (Twitter) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे खाते अनलॉक ( केले आहे.गेल्या गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांच्या भेटीचा फोटो ट्वीट केला होता. ज्याला भाजपने आक्षेप घेतला. तर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानेही ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत राहूल गांधीवर कारवाई कऱण्याची मागणी केली होती. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवत त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं निलंबित केलं.

पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केल्याचे आरोप करत ट्विटरने राहुल गांधीना या संदर्भातील स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर कॉंग्रेसने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्वीट करत ”राहुल गांधी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय राहतील.” अशी माहिती दिली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी त्यांचे ट्विटर हँडल अनलॉक होण्याच्या एक दिवस आधी एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी करून ट्विटरवर निशाणा साधला होता. ” एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे, जो लोकशाहीवर हल्ला आहे. हा फक्त माझा आवाज बंद करण्याचा विषय नाही, करोडो लोकांना शांत करण्याचा विषय आहे,” अशा शब्दांत राहूल गांधी यांनी ट्विटरवर निशानणा साधला होता.विशेष म्हणजे, पिडीत कुटुंबाचा फोटो ट्विटरवर शेअर करण्याबाबत त्यांना काहीच आक्षेप नसल्याचे पिडीतेच्या आईने सांगितले होते.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 14, 2021, 1:52 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *