भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात गाव विकास समितीचा रस्ता रोको आंदोलन,वाहनांच्या लागल्या लांब रांगा
वज्रेश्वरी : भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थे विरोधात गाव विकास समितीच्या वतीने बुधवारी खारबाव , कालवार व कामण या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील सुमारे दहा ते बारा गावातील स्थानिक नागरिकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. या रास्ता रोको आंदोलनामुळे खारबाव परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती . वाहनांच्या सुमारे चार ते पाच किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.
भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी या राज्य महामार्गाची सद्टीह्या प्रचंड दुरावस्था झाली असून सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे . या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून अनेकांचा या महामार्गावरील खड्डयांमुळे जीव गेला आहे.
सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा रस्त्याबाबत दुर्लक्षित धोरणामुळे स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येत सर्वपक्षीय गाव विकास संघर्ष समिती स्थापन केली असून या गव विकास समितीच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वाजता चिंचोटी अंजूरफाटा ते माणकोली या महामार्गावर कामण , खारबाव , कालवार अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करा, जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल नाका बंद करा , अपघात मृत्यू , जखमी व कायम स्वरूपी अपंगत्व आलेल्या नागरिकांना आर्थिक मदत करा. अशी मागणी यावेळी यावेळी आंदोलकांनी केली. खारबाव येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करत पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्यासाठी पुढाकार घेतल्याने आंदोलकांनी दिड तास रोखून धरलेला रस्ता सुरळीत करण्यात आला. मात्र पूर्वनियोजित असलेल्या या आंदोलनाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत पोलोसांसमोर आपला राग व संताप व्यक्त केला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 19, 2021, 2:44 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY