शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांची “या” आरोपामुळे होणार चौकशी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तसेच शिवसेनेच्या नेत्या (Shivsena) उर्मिला मातोंडकर यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्या उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील आहे.
येथे एका हॉटेलच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर या उपस्थित झाल्या होत्या. यावेळी नियमांचे पालन करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मेदिनीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात कोरोनासंबंधी निर्बंधांचे उल्लंघन झाल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली अशी माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे हॉटेल प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले असून नियमांचे पालन झाल्याचा दावा केला आहे. उर्मिला मातोंडकर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या अशी माहिती हॉटेल प्रशासनाने दिली आहे. कोरोनामुळे आपण या कार्यक्रमासाठी दोन तासांऐवजी एक तासच उपस्थित राहू असे उर्मिला मातोंडकर यांनी कळवले होते असंही त्यांनी सांगितले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 14, 2021, 2:22 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY