… अन्यथा ED अन् CBI चौकशी मागे लावू ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांना धमकी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना (Shiv Sena) सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar ) यांना अज्ञाताकडून धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणी मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुंबई पोलिसां गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅपद्वारे धमकी मिळाली. धमकीमध्ये आपल्या मागण्या पूर्ण करा अन्यथा तुमच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी लावू असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहाय्यकासच धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, मिलिंद नार्वेकर यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद नार्वेकर यांच्याकडे तक्रार दिली आहे. मिलींद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासून सहकारी म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या वतीने पडद्यामागून सूत्र हालविण्यात नार्वेकर अतिशय निष्णात असल्याचे बोलले जाते. शाखाप्रमुख व्हायचं स्वप्न बाळगून असलेला शिवसेना गटप्रमुख ते उद्धव ठाकरे यांचा स्वीय सहाय्यक आणि आता शिवसेना सचिव असा नार्वेकर यांचा प्रवास आहे. मुंबई प्रीमियर लीग गव्हर्निंग कौन्सील अध्यक्ष म्हणूनही नार्वेकर हे पाठिमागील वर्षापासून कार्यरत आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 14, 2021, 2:05 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY