Breaking News

राज्यसभेतला गोंधळाचा सीसीटीव्ही व्हिडिओ जारी ; मार्शल्सकडून महिला खासदारांना धक्काबुक्की, अनुराग ठाकूर म्हणाले –

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 12, 2021 5:46 pm
|

नवी दिल्ली: बुधवारी संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावरुन देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, राज्यसभेतील या गोंधळाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात विरोधी पक्षाचे सदस्य मार्शलसोबत संघर्ष करताना दिसत आहेत. साधारण 2.5 मीनिटांचे हे फुटेज आहे. या व्हिडीओमध्ये विरोधी खासदार आंदोलन करत असल्याचे दिसून येत आहे आणि या दरम्यान त्यांना आवर घालण्यासाठी मार्शलला बोलावण्यात आले. खासदार आणि मार्शल यांच्यातील संघर्ष यामध्ये स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये काही खासदार टेबलावर चढताना दिसत आहेत. काही महिला खासदारांनाही धक्काबुक्की केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, राज्यसभेमध्ये चर्चा सुरू असताना बुधवारी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली होती. पेगॅसस आणि कृषी विधेयकांप्रमाणेच अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली. यावेळी विरोधी पक्षाच्या काही महिला खासदारांनी वेलमध्ये उतरून कागद फाडून भिरकावले. तसेच, अनेक विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी मार्शल्सकरवी एक कडंच राज्यसभेत उभं करण्यात आलं. या प्रकारावरून सरकरावर विरोधकांनी लोकशाहीची हत्या केल्याची टीका केली आहे.

या प्रकरणावरुन केंद्रीय मंत्र्यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान अनुराग ठाकूर म्हणाले की, विरोधकांनी कामात अडथळा आणण्याचे काम केले आणि यासाठी त्यांनी देशाची माफी मागावी.देशातील जनता त्यांच्याशी संबंधित विषय सभागृहात उपस्थित होण्याची वाट पाहत आहे, तर रस्त्यापासून संसदेपर्यंत विरोधकांचा एकमेव अजेंडा केवळ अराजकताच होता.

त्याच वेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले, ‘काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संसदेचे कामकाज चालू न देण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्यांनी नवीन मंत्र्यांना आणू दिले नाही, त्यांनी महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चाही केली नाही. राज्यसभा अध्यक्षांनी नियम मोडणाऱ्या विरोधी खासदारांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 12, 2021, 5:46 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *