विवाहबाह्य संबंध, , जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप
नवी मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत आणि मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ या आणि अशा आदी कलमांखाली काळे यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचाही आरोप पत्नीने नोंदवलेल्या FIR मध्ये केला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 12, 2021, 4:19 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY