काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधींसह काँग्रेसच्या 5 मोठ्या नेत्यांवर ट्विटरकडून कारवाई; थोरात म्हणाले …
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसच्या इतर अनेक दिग्गज नेत्यांचे ट्विटर अकाउंट लॉक करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजय माकन, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम काँग्रेस प्रभारी जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाउंट लॉक केल्याचा पक्षाने आरोप केला आहे.
महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत ‘मैं भी राहुल’, असं ट्विट केलं होतं. राहुल यांनी नियमांचं भंग करणारा फोटो शेअर केला होता, त्याच फोटोला पाठिंबा किंवा भूमिकाला पाठिंबा दर्शवणारं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केल्याने त्यांचंही ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलं आहे. यावर बाळासाहेब थोरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले नागरिकांच्या विचारांची गळचेपी करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. ट्विटर ही आंतररष्ट्रीय कंपनी असूनही भाजपच्या दाबवाखाली काम करत आहे. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही आमचा लढा सुरुच ठेऊ, हम लढेंगे,. ट्विटर हे एक समाज माध्यम आहे. त्यावर आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार नागरिकांना आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच आपापल्या पद्धतीने मत मांडण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. समाजाच्या हिताच्या ज्या गोष्टी असतात त्या मांडण्याचा अधिकार राज्य घटनेमध्ये आहे. त्याच गोष्टी मांडण्याचा प्रयत्न आम्ही ट्विटरच्या माध्यमातून करत होतो. मात्र ट्विटरने काँग्रेस नेत्यांच्या ट्विटरवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. भाजपाच्या दबाव खाली काम करणे योग्य नाही. त्यामुळे एकंदरच कशा पद्धतीने लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी चाललेली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले की, ट्विटरनेही माझे अकाउंट लॉक केले आहे, कारण मीही राहुल गांधींना महिला आणि दलित अत्याचाराविरोधात पाठिंबा दिला आहे. लवकरच खऱ्याचे चांगले दिवस येतील आणि तुम्ही (ट्विटर) घाबरणार नाही. हा माझा अंदाज आहे.
काय आहे प्रकरण
सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीसंदर्भात राहुल गांधी हे ट्विट केलं होतं. दिल्लीतील छावणी परिसरालगत असलेल्या एका गावात एका नऊ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. ऐन पावसाळी अधिवेशनादरम्यान ही घटना घडल्यानं राजकीय पक्षांकडून पीडितेच्या कुटुंबियांच्याही भेटी घेण्यात आल्या होत्या.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांच्या फोटोसह एक ट्विट केलं होतं. त्याचबरोबर न्याय मिळेपर्यंत आपण पीडितेच्या कुटुंबियांसोबत असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान राहुल गांधी यांच्या ट्विटवर आक्षेप घेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते मकरंद सुरेश म्हाडलेकर यांनी यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बलात्कार पीडितेची ओळख उघड न करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती.
उच्च न्यायालयसमोर झालेल्या सुनावणी वेळी उच्च न्यायालयाच्या खंठपीठाने ट्विटरचे वकील सज्जन पुवय्या यांना राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटबद्दल विचारणा केली होती. राहुल गांधींनी केलेलं ट्विट हटवण्यात आलं आहे का? असं न्यायालयाने विचारलं; त्यावर ते ट्विट ट्विटरच्या धोरणाविरोधात असून, हटवण्यात आलेलं आहे, असं पुवय्या यांनी सांगितलं. त्यावर न्यायालयानं ट्विटरचं कौतुक केलं. त्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. फोटो आणि ट्विट कधी हटवण्यात आलं, याबद्दल ट्विटरने प्रतिज्ञापत्र सादर करावं, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 12, 2021, 3:22 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY