Breaking News

संजय राऊत संतापले :ही कसली मर्दाणगी ?खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना पाचारण करता !

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 12, 2021 2:04 pm
|

नवी दिल्ली: राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना पाचारण करता ही कसली मर्दानगी आहे?, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.

मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मार्शल बोलावणं ही काही नवी गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही कमांडोज बोलावले जातात. पण जणू काही एखादी दंगल घडते आणि दंगल अटोक्यात येत नाही, तेव्हा सैन्याला बोलावलं जातं तसं बंदुका घेऊन सैन्य बोलावलं गेलं. भारात-पाकिस्तानच्या सीमेवरही असं सैन्य नसेल. तिथे सरळसरळ घुसखोरी होते. चीनचे लोकं घुसत आहेत. तिथे अशाप्रकारे व्यवस्था नाही आणि संसदेत खासदारांसमोर महिला कमांडोज होत्या. तो नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग तो अशा महिला कमांडोज घेऊन फिरतो. काल संसदेतही आम्ही पुढे जाऊ नये म्हणून हे कमांडोज आणले. महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी आहे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

राज्यसभेत नेमकं काय घडलं?

राज्यसभेत रुल बुक फेकले असेल तर याचा अर्थ सरकारने नियमांचं पालन केलं नाही. रुल बुक वाचा आणि संसदेचं कामकाज चालवा यासाठी प्रताप बाजवा यांनी रुल बुक फेकलं असं म्हणणं आहे. कारण नियमानुसार काम चालत नव्हतं. बुधवारी पाच साडेपाच वाजता घटना दुरुस्ती बिलावर शांतपणे, सहमतीने चर्चा सुरू होती. बहुमताने बिल मंजूर करून घेतलं. संपूर्ण विरोधी पक्षाने सहकार्य केलं. मात्र जे इन्श्युरन्स संदर्भातील बिल आहे. विमा कंपन्यांचं खासगीकरण करण्याचं त्याला विरोध आहे. देशभरातून विरोध आहे. ते आज न आणता उद्या आणावं असं काल सकाळी ठरलं होतं. या बिलावर उद्या चर्चा करण्यावर सहमतीही झाली. जेव्हा एसईबीसी बिल मंजूर झालं. तेव्हा लगेच या बिलावर कारवाईला सुरुवात झाली. त्यावर सर्व विरोधक उठले. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेही उठले. त्यांनी विरोध केला. पण सभागृह नेते पीयूष गोयल आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे बिल रेटण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला त्यातून गोंधळ उडाला.

शरद पवारांनीही व्यक्त केली नाराजी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली. 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कोणत्याही सभागृहात असं चित्रं पाहिलं नाही. हे पवारांसारख्या नेत्याला अस्वस्थतेतून बोलावं लागलं. माझ्याशी बोलले ते. मीडियाशी बोलले. ते फार अस्वस्थ होते. ज्यांनी संपूर्ण हयात संसदीय राजकारणात घालवली आहे ते सर्व नेते अस्वस्थ होते, असंही राऊत यांनी सांगितलं.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 12, 2021, 2:04 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *