किन्नौर : हायवेवर कोसळली दरड; ढिगाऱ्याखाली अडकली बस, 40 पेक्षा जास्त प्रवासी ढिगाऱ्याखाली
शिमला: हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये तळीये गावाची पुनरावृत्ती झाली आहे. किन्नौरहून हरिद्वारकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग -5 वर ज्युरी रोडवर निगोसारी आणि चौरा दरम्यान अचानक डोंगर कोसळला. बस आणि अनेक वाहनांवर दरड कोसळली. रिपोर्ट नुसार, 40 पेक्षा जास्त प्रवासी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एनडीआरएफची टीम बचावकार्यात गुंतली आहे. दरडीखाली अडकलेली बस हरियाणा रोड ट्रान्सपोर्टची होती, जी मुरंगहून हरिद्वारला जात होती. त्यावेळी निगुलसेरी जवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत बस चालक बचावला आहे. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर बचावकार्यासाठी ITBP चं पथक रवाना झालं आहे. या दरड दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही या घटेनला दुजोरा दिला आहे. तसेच NDRF पथकालाही आमंत्रित केल्याचं त्यांनी सांगितलं. दरडीखाली एक बस आणि कार आल्याची माहिती मिळाल्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितलं.
किन्नौर : हायवेवर कोसळली दरड; ढिगाऱ्याखाली अडकली बस, 40 पेक्षा जास्त प्रवासी ढिगाऱ्याखाली#Debris #HimachalPradesh #TransportCorporation #HRTC #Kinnaur #Landslide pic.twitter.com/eERUAARDWH
— Kaaltarang News Marathi (@kaaltarangnews) August 11, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 11, 2021, 3:41 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY