“राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना?”
नाशिक : काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते असलेल्या राहुल गांधी हे जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) या दौऱ्यावर असताना कश्मीरमध्ये बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटावरुन बोलताना नाना पटोले यांनी म्हटले आहे की, ”राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? ” असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या सुरक्षेवरुन केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. नाशिकमध्ये ‘व्यर्थ ना हो बलिदान’ कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, जम्मू-कश्मीर दौऱ्यात राहुल गांधी यांनी खीर भवानी मंदिर आणि हजरतबाल या दोन धार्मिक स्थळांना भेट दिली. या भेटीसाठी राहुल गांधी सोमवारी जम्मू-कश्मीरमध्ये पोहोचले.
“राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये गेले आहेत. तिथे ते गेले अन् बॉम्बस्फोट झाला. ते तिथून निघून गेले होते म्हणून बरं झालं. राहुल गांधी जिथे थांबले होते तिथून ५०० मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. नोटाबंदी झाल्यावर दहशतवाद संपेल असं यांनी सांगितलं होतं. पण मग दहशतवाद संपला का? नोटाबंदीचं सोडून द्या, पण मग तुमच्याकडे इतकी मोठी यंत्रणा असताना दहशतवादी राहुल गांधी होते तिथपर्यंत कसे काय येऊ शकले,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली.
पुढे पटोले म्हणाले की “देशासाठी गांधी कुटुंबातील दोन व्यक्तींनी बलिदान दिलं आहे. या देशाच्या मातीत त्यांचं रक्त सांडलं. जे राहुल गांधी आज देशाच्या जनतेचा आवाज होऊन देशासाठी काम करत आहेत, त्यांना संपवण्याचा हा कट तर नाही, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो.”
जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्या मुलाच्या विवाहास काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. दरम्यान, एम ए रोड येथे त्यांच्या हस्ते काँग्रेस भवनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्ते व नेते यांच्याशी संवाद साधला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 11, 2021, 2:56 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY