15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकल रेल्वे प्रवासाची मुभा; लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू

मुंबई :15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.लसीचे दोन घेतलेल्या नागरिकांना लोकांना प्रवास करता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ११ तारखेपासून अर्थात आजपासून मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी पास देण्यात येत आहेत. त्यासाठी मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी प्रवाशांची नोंदणी आणि क्यूआर कोड पास देण्यात येत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले असल्यास मासिक पास मिळू शकणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही सेवा उपलब्ध आहे. ११ ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन मासिक रेल्वे पास प्रक्रिया आणि कोव्हिड लसीकरण ऑफलाईन पडताळणी सुरू केली जाणार आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
दरम्यान ,रेल्वे मासिक पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी सुरू राहणार आहे त्यामुळे लोकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये असंही आवाहन चहल यांनी केलं आहे.
काय आहेत या प्रक्रियेच्या अटी?
नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोव्हिड लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाल्याचे प्रमाणपत्र आणि छायाचित्र ओळखपत्र पुरावा म्हणून आणणे आवश्यक
पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा
मुंबई महापालिका क्षेत्रातील ५३ रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष उभारले जाणार
मुंबई महापालिका क्षेत्रात 109 स्थानकांवर मदत कक्ष
सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत दोन सत्रांमध्ये कार्यरत राहणार मदत कक्ष
घराजवळच्या स्थानकांवर पडताळणीसाठी जावं मात्र विनाकारण गर्दी करू नये
कोव्हिड लसीकरणाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचं आढळल्यास कठोर पोलीस कारवाई केली जाणार
मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 ऑगस्टच्या रविवारी केली. त्या अनुषंगाने ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
https://twitter.com/ANI/status/1425293585352585219
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 11, 2021, 1:23 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY