पुण्यात मुलगी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकली, अथक प्रयत्नांनंतर मुलीची सुखरुप सुटका
पुणे : पुण्यात (Pune) अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका केली आहे. या सुटकेचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे. पुण्यातील शुक्रवार पेठेत ही घटना घडली, येथे 15 वर्षांची एक मुलगी केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली असता, तिचा पाय घसरला आणि ती तोल जाऊन खाली पडली. परंतु नशिबाने ती मुलगी चौथ्या मजल्याच्या एका खिजकीच्या सज्जावर अडकली. घटना घडताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. ही मुलगी काही सेंटिमीटर जागेमधे उभी असल्याने पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला. त्यानंतर या मुलीला वाचवण्यासाठी लोकांनी गर्दी केली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलीची सुखरुप सुटका करुन तिचे प्राण वाचवले आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळी, शिडी आणि रशीच्या साहाय्यानं त्या मुलीच्या कमरेलाही दोरी बांधली आणि ते मुलीला घेऊन शिडीवरून सुखरुप खाली उतरले. या कामगिरीमधे अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, वाहनचालक राजू शेलार जवान राहूल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकूळे, किशोर बने, संजय पाटील, अक्षय गांगड, विठ्ठल शिंदे सहभाग घेतला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 9, 2021, 4:24 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY