Breaking News

मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला रुपये 7 लाख 25 हजार 600 चा मुद्देमाल

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 9, 2021 2:46 pm
|

अलिबाग,:- मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाने 7 लाख 25 हजार 600 रुपयेचा मुद्देमाल पकडला आहे. गोठणवाडी येथे एक आरोपी व विदेशी मद्य- रूपये 40 हजार 800, तर रोहा येथे दोन आरोपी व एक वाहन- किंमत रूपये 5 लाख 72 हजार आणि बनावट विदेशी मद्य रुपये 1 लाख 12 हजार 800, अशा प्रकारे एकूण रुपये 7 लाख 25 हजार 600 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती श्री.आनंद अं.पवार,निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुरुड विभाग यांनी दिली आहे.

यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे, उप अधीक्षक श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा मुद्देमाल दि. 6 ऑगस्ट 2021 रोजी गोठणवाडी,कोकबन,ता. रोहा येथे जप्त केला आहे. तर रोहा कोलाड बायपास रोड, थिम पार्क गार्डन जवळ,भाजी मार्केटच्या समोर, रोहा, जि.रायगड येथे श्री.आनंद अं.पवार, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुरुड विभाग, श्री.रमेश एम.चाटे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खालापूर सुधागड विभाग, श्री.अंकुश बी. बुरकुल, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,रोहा मुरुड विभाग, श्रीमती आर. व्ही.नरहरी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, महिला जवान श्रीमती.अपर्णा सी.पोकळे,जवान श्री.निमेष एस.नाईक आणि श्री.गणेश के.घुगे या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या चार चाकी एर्टिका MH 05 CA 3044 सह 129.6 बल्क लिटर (एक बॉक्स मद्य = 8.64 बल्क लिटर) विदेशी मद्य जप्त करून एकूण तीन आरोपींना अटक केली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 9, 2021, 2:46 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *