Breaking News

आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 9, 2021 1:32 pm
|

मुंबई : क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर राहिलेल्या आदिवासी क्रांतीकारकांना अभिवादन करून रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या माध्यमातून स्वशासन या आधारे स्वतंत्र जीवनशैली जगणाऱ्या लढवय्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पाडवी म्हणाले की, आधुनिक जगात प्रगतीच्या दिशेने जाताना आपल्या गौरवशाली परंपराचे जतन करणारा आदिवासी समाज हा एकमेव आहे. दुर्गम भागात राहूनही आता हा समाज आधुनिकतेची कास धरत आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याचे काम राज्य सरकार करत आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.

लॉकडाउन काळात आदिवासी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजनेतून बँक खात्यात थेट आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच अन्न धान्याचे किट वितरण सुरू आहे. केंद्रीय व राज्यातील प्रशासनात आदिवासी तरुणांचा टक्का वाढावा यासाठी सहाय्य करण्यात येत आहे. अशा विविध योजनांतून आदिवासी बांधवाना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 9, 2021, 1:32 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *