‘चुकीच्या बातम्या करु नका, एखादी बातमी कमी पडली तर मला मागा मी देतो’- देवेंद्र फडणवीस
पुणे : महाराष्ट्रात कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. आत्ताच नवीन मंत्रीमंडळ झालेलं आहे, त्यांच्या भेटीगाठी आणि महाराष्ट्राचे प्रश्न यावरच भाजपच्या नेत्यांचे दिल्ली दौरे दौरा वाढले असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. कृपया कंड्या पिकवू नका आणि पतंगबाजी करु नका, चुकीच्या बातम्या करु नका, एखादी बातमी कमी पडली तर मला मागा मी देतो’ असे देवेंद्र फडणवीस आज पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी म्हटले .
फडणवीस म्हणाले, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अतिशय उत्तम काम करत आहेत, आम्ही सगळेच त्यांच्या पाठीशी आहोत, हायकमांड ही त्यांच्या पाठीशी आहे, केंद्रात नवीन मंत्री झाले आहेत, त्यांच्या भेटीगाठी घ्यायला दादा व अन्य पदाधिकारी दिल्लीला गेलेत. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही भाजपाची भूमिका असल्याचा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
फडणवीस म्हणाले. मातंग समाज, बुरुड समाज, चर्मकार समाज, वाल्मिक-सुदर्शन समाज यांच्यापर्यंत आरक्षण पोचलेले नाही. त्यांच्या पर्यंत आरक्षण पोचण्याकरिता वर्गवारी करणे आवश्यक आहे. आरक्षण देऊनही अनेक समाज मागे राहिले आहेत. दीर्घकालीन आरक्षण सुरु ठेवण्यासोबतच जे समाज घटक आरक्षणामधून सुटले आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचले पाहिजे याकरिता यंत्रणा उभारावी लागेल.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 7, 2021, 5:30 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY