Breaking News

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती ; आदित्य ठाकरेंसह महापौर घटनास्थळी दाखल

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 7, 2021 3:24 pm
|

मुंबईः मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅस गळती झाल्याचे वृत्त आहे. दुपारी बाराच्या सुमारास ही गळती झाली. गळती सुरू होताच हॉस्पिटलमधील सर्व रुग्ण आणि त्यांचे नातलग यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर 3 पाण्याचे टँकरही घटनास्थळी पोहोचले. या रुग्णांपैकी 20 हे कोविड 19 चे रुग्ण आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. गॅस गळतीचे कारण स्पष्ट नाही.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील काही वेळापूर्वी रुग्णालयात पोहचून घटनास्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान सुदैवानं या दुर्घटनेत अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही आहे. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात एलपीजी प्लांटमधून गॅसची गळती झाली, असं वृत्त समोर आले आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रात्री 1.05 वाजता तात्काळ दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली. रुग्णालय प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे धोका टळला असे त्या म्हणाल्या . अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अन्यथा त्याचे मोठ्या अपघातात रुपांतर होऊ शकले असते असेही त्यांनी म्हटले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 7, 2021, 3:24 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *