मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळतीमुळे उडाली खळबळ ! 58 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवले

मुंबईः मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅस गळती झाल्याचे वृत्त आहे. दुपारी बाराच्या सुमारास ही गळती झाली. गळती सुरू होताच हॉस्पिटलमधील सर्व रुग्ण आणि त्यांचे नातलग यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर 3 पाण्याचे टँकरही घटनास्थळी पोहोचले. या रुग्णांपैकी 20 हे कोविड 19 चे रुग्ण आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. गॅस गळतीचे कारण स्पष्ट नाही.
Maharashtra: An incident of LPG leakage reported at Kasturba Hospital in Chinchpokli of Mumbai. No injuries/casualties reported. A total of 58 patients shifted from here, of these 20 are #COVID19 patients.
— ANI (@ANI) August 7, 2021
मुंबईच्या चिंचपोकळी भागातील आर्थर रोड जेलजवळ कस्तुरबा हॉस्पिटल आहे. येथे एलपीजी गॅस पाइपलाइन लीक झाली. यानंतर रुग्णांना तातडीने रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. काही वेळातच सर्व रुग्णांना जवळच्या इमारतीत हलवण्यात आले. सर्व कर्मचारीही तत्काळ रुग्णालयातून बाहेर आले. गॅस गळतीची घटना उघडकीस आली तेव्हा बरेच रुग्ण उपस्थित नव्हते. यामुळे मोठा अपघात टळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रात्री 1.05 वाजता तात्काळ दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली. रुग्णालय प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे धोका टळला असे त्या म्हणाल्या . अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अन्यथा त्याचे मोठ्या अपघातात रुपांतर होऊ शकले असते असेही त्यांनी म्हटले.
कस्तुरबा रुग्णालय येथे एलपीजी टॅंकमधून गॅस गळती झाली त्याठिकाणी तात्काळ दखल घेऊन महापौर या नात्याने घटनास्थळी भेट दिली, रुग्णालय प्रशासनाने दाखवलेली तत्परता व अग्निशमन दलाच्या वतीने कौशल्य अतिशय कौतुकास्पद होते, त्यामुळेच खूप मोठी दुर्घटना रोखण्यात प्रयत्नशील राहता आले . pic.twitter.com/P0B0dft7qW
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) August 7, 2021
कस्तुरबा रुग्णालयात काय घडले?
एलपीजी गॅस गळतीची घटना कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारात सकाळी 11.30 च्या सुमारास उघडकीस आली.आधी परिसरात वायूचा वास येत होता. यानंतर अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना इतरत्र नेण्याचे काम सुरू केले. दरम्यान, पाण्याचे 3 टँकरही रुग्णालयात पोहोचले. अशा प्रकारे, परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणली गेली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 7, 2021, 2:42 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY