तेजस ठाकरेची क्रिकेटपटू ‘व्हिव्हियन रिचर्डस’ सोबत तुलना ; शिवसेना नेत्याच्या शुभेच्छांची राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये एक जाहिरात छापली असून, याच जाहिरातीवरून मोठी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या जाहिरातीमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यासोबतच त्यांनी तेजस ठाकरे यांना “ठाकरे कुटुंबाचा व्हिव्हियन रिचर्ड्स” म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. या जाहिराती मागे तेजस ठाकरेंच्या देखील राजकीय प्रवेशाचे संकेत आहेत का? याची चर्चा आता जोर धरायला लागली आहे. मात्र मीडीयाशी बोलताना त्यांनी ही शक्यता सध्या फेटळली आहे.
क्रिकेटचं मैदान आपाल्या दमदार कामगिरीने गाजवणार्या व्हिव्हियन रिचर्ड्स प्रमाणेच तेजस ठाकरे रोखठोक आहेत. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे त्यांची राजकारणात एंट्री होऊ शकते असे राजकीय विश्लेषक अंदाज बांधत आहेत. पण मिलिंद नार्वेकरांनी आजची सामनातील जाहिरात त्यांच्या कौटुंबिक संबंधातून दिल्याचं स्पष्ट करत तूर्तास चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान तेजस ठाकरे हा Wildlife photographer आणि Naturalist म्हणून काम करत आहे. त्याने Thackeray Wildlife Foundation ची स्थापना केली आहे. अनेक वन्यजीवांच्या प्रजातींचा त्याने शोध लावला आहे. पण आता त्यासोबतीने तो शिवसेने मध्ये सक्रिय सहभाग घेणार का? हे पहावं लागणार आहे. काही महत्त्वाच्या प्रसंगी तेजस ठाकरे राजकीय सभांना व्यासपीठावर दिसले आहेत. प्रचारसभांना दिसले आहेत. सध्या आदित्य ठाकरेंकडे कॅबिनेट मंत्रीपदाचा भार असल्याने युवासेना अध्यक्ष पदाची त्यांच्याकडील जबाबदारी अन्य कोणाकडे जाण्याची देखील चर्चा आहे. त्यांचे मावसभाऊ वरूण सरदेसाई यांचं नाव त्यासाठी चर्चेत आहे पण अशावेळीच तेजस कडे देखील ही जबाबदारी जाऊ शकते असे अंदाज बांधायला सुरूवात झाली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 7, 2021, 2:19 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY