Breaking News

मुंबईत बिग बींचा बंगला आणि “हे ” रेल्वे स्टेशन बॉम्बने उडून देण्याचा फोन, पोलीस संरक्षणात वाढ, 2 जण ताब्यात

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 7, 2021 1:13 pm
|

मुंबई मध्ये काल रात्री पोलिस कंट्रोल (Mumbai Police Control Room) मध्ये आलेल्या निनावी कॉल मुळे शहरात आणि पोलिस विभागामध्ये काही काळ खळबळ पसरली होति. एका निनावी व्यक्तीकडून (Unidentified person) मुंबईच्या (Mumbai) काही रेल्वेस्थानकांवर (railway stations) आणि बॉलीवुड (Bollywood) अभिनेते (actor) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बंगल्यावर (bungalow) बाँब (bomb) ठेवल्याची धमकी (threat) मिळाल्यानंतर सर्वत्र धावाधाव सुरू झाली. आज सकाळी ANI कडून देण्यात आलेल्या ट्वीट मध्ये मुंबई पोलिसांनी हा निनावी कॉल केवळ अफवा असल्याचं आता स्पष्ट केले आहे. सध्या पोलिसांकडून हा फोन कॉल करणार्‍या व्यक्तीचा आणि लोकेशनचा शोध सुरू आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) (CSMT), भायखळा (Byculla), दादर (Dadar) रेल्वे स्थानकांवर तसेच बच्चन यांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्था (security) वाढवण्यात आल्यानंतर तातडीने बॉम्ब स्कॉड आणि जीआरपी टीम कडून तपास सुरू करण्यात आला.दरम्यान मुंबई मध्ये 4 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोन कॉल प्रकरणामध्ये Crime Branch’s CIU कडून 2 जण ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 7, 2021, 1:13 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *