Breaking News

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 6, 2021 5:48 pm
|

नागपूर – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आपल्या कारवाईचा फास अधिकाधिक आवळायला सुरुवात केली आहे. एकीकडे ईडीने वारंवार चौकशीसाठी नोटीस बजावून देखील अनिल देशमुख उपस्थित राहात नसताना दुसरीकडे अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापेमारी सुरूच ठेवली आहे. ईडीने आज दुपारी अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आणि गाव असलेल्या काटोल मर्गावरील माऊझरी येथे ल नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्याालय आहे. या महाविद्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. इडीने आतापर्यंत अनिल देशमुख यांच्या आणि त्यांच्याशी संबंधीत मालमत्तांवर अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. मात्र, महाविद्यालयावर धाड टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर नागपुरातील अनिल देशमुख यांच्याशी संबंधित इतर काही ठिकाणांवर देखील ईडीने छापे टाकल्याचे वृत्त एएनआयने दिली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसा, अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत चार वेळा समन्स बजावले आहे. समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. ईडीने देशमुख यांना सोमवारी चौथ्यांदा समन्स बजावले. तरीदेखील अनिल देशमुख गैरहजरच राहिले. त्यामुळे ते नेमके आहेत तरी कोठे असा सवाल उपस्थित केला जात आहे. इडीलाही हाच प्रश्न पडला आहे. इडीने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे की, अनिल देशमुख कोठे आहेत याबाबत आम्हाला माहिती नाही. दरम्यान, ईडीच्या या उत्तरावर सर्वोच्च न्यायालय आज काय उत्तर देते याबाबत प्रतिक्षा आहे.

एएनआय ट्विट

एका बाजूला ईडीचा ससेमीरा पाठीमागे असतानाच दुसऱ्या बाजूला सीबीआयकडूनही अनिल देशमुख यांच्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारला नोटीस बजावली गेली आहे. मुंबई पोलिसांवर सीबीआयने गंभीर आरोप केले असून मुंबईच्या एसपींनी सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा दावा सीबीआयने तक्रारीत केला आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे. मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचाही सीबीआयचा दावा आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 6, 2021, 5:48 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *