पाकिस्तान: धर्मांध समाजकंटकांकडून हिंदू मंदिराची तोडफोड; सुप्रीम कोर्ट संतप्त, आरोपींना अटक करण्याचे निर्देश (Video)
इस्लामाबाद : कट्टरपंथीयांनी पुन्हा एकदा पाकिस्तानातील मंदिराला लक्ष्य केले आहे. ताजे प्रकरण पाकमधील पंजाबच्या भोंग शहरातील आहे. धार्मिक कट्टरपंथीयांनी भरदिवसा स्थानिक गणपती मंदिराला लक्ष्य केले. मंदिर तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना कसे ठेचले जात आहे, त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.मंदिरावरील या हल्ल्यानंतर स्थानिक हिंदूंमध्ये प्रचंड संताप आहे. असे असूनही स्थानिक प्रशासन हे प्रकरण लपवण्यात व्यग्र आहे.व्हिडिओमध्ये सर्व हल्लेखोरांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत.
Attack on Hindu temple at Bhong City District Rahimyar Khan Punjab. Situation was tense since yesterday. Negligence by local police is very shameful. Chief Justice is requested to take action. pic.twitter.com/5XDQo8VwgI
— Dr. Ramesh Vankwani (@RVankwani) August 4, 2021
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याबाबत भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले की, पाकिस्तान उच्चायुक्ताच्या प्रभारींना मंदिर तोडफोडप्रकरणी बोलावण्यात आले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, अल्पसंख्याक समुदायाविरुद्ध हिंसा आणि अत्याचाराच्या घटनांसह प्रार्थनास्थळांवर हल्ले पाकिस्तानमध्ये चिथावणीशिवाय सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात जमावाने एका हिंदू मंदिरावर हल्ला केला. मंदिरातील काही भाग जाळण्यात आला आणि मूर्ती फोडण्यात आल्या. हे ठिकाण लाहोरपासून 590 किलोमीटर अंतरावर आहे. कथितरीत्या असे सांगण्यात येत आहे की, मदरशाची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर काही लोकांच्या जमावाने ही मंदिरावर हल्ला चढवला. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि हिंदू पंचायतीचे संरक्षक जय कुमार धिरानी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे .या घटनेसंदर्भात त्यांनी बुधवारी अनेक ट्विट केले आणि “जाळपोळ आणि तोडफोड” टाळण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांना लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्याचे आवाहन केले.
. यामध्ये ते म्हणाले, “रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील हिंदू मंदिरावर हल्ला. काल परिस्थिती अतिशय तणावपूर्ण होती. स्थानिक पोलिसांचे लाजिरवाणे दुर्लक्ष. मी सरन्यायाधीशांना कारवाई करण्याची विनंती करतो.”
रहिम यार खानचे जिल्हा पोलीस अधिकारी (डीपीओ) असद सरफराज यांनी सांगितले की, सुमारे 100 हिंदू कुटुंबे या परिसरात राहतात आणि कोणतीही अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या घटनेच्या संदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 6, 2021, 4:46 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY