राज्यात भाजप- मनसेचं सूत जुळणार?, यावर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई : शिवसना (Shiv Sena ) पक्षाशी असलेली युती तुटल्यानंतर भाजप नव्या मित्राच्या शोधात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. मनसेचे इतर राज्यांबाबत आणि परप्रांतीयांबाबत असलेले विचार आम्हाला मान्य नाहीत. असे असले तरी राजकीय गाठीभेटी व्हायला हव्यात. या भेटीगाठी महत्त्वाच्या असतात म्हणूनच मी राज ठाकरे यांची भेट घेत आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यातील आजची भेट म्हणजे मनसे भाजप युतीचे संकेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तरीही या भेटीकडे संभाव्य मनसे-भाजप युतीच्या (MNS-BJP Alliance) नजलेतूनच पाहिले जात आहे.
राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, राज ठाकरेंसोबत नाशिकला अचानक भेट झाली होती. त्यावेळेला त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी घरी यायचं आमंत्रण दिलं होतं. घरी चहा प्यायला बोलावणं ही महाराष्ट्राची संस्कृती, पंरपरा आहे. त्यानंतरच्या आमंत्रणानंतर आज भेटायला आलो. या भेटीत परप्रांतीयांच्या भूमिकेबाबत चर्चा झाली. राज यांनी क्लिप दाखवली. युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसदर्भात चर्चा झाली . महाराष्ट्राचा नेता होण्यासाठी त्यांनी व्यापक भूमिका घेणं गरजेचं आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पाटील म्हणाले, दोन भूमिका कुठल्याही माणसाच्या असतात, एक माणूस म्हणून आणि एक नेता म्हणून. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकेवर चर्चा करायची होती. ज्या काळत मुंबईत मी विद्यार्थी दशेत होतो आणि अभाविपचं काम करायचो त्यावेळे ते भारतीय विद्यार्ती सेनेचं काम करायचे, तेव्हापासूनच माझ्या मनात नेहमी त्यांच्याबद्दल आकर्षण राहिलेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं आहे, केवळ दिसण्यापुरतं नाही तर बोलण्यातील स्पष्टता, आपल्या मुद्दयांवर आग्रही राहणं. त्यामुळे व्यक्ती म्हणून एकमेकांचं सुख पाहणं, यश पाहणं हे आलंच. परंतु त्यांनी मोठ्या भूमिकेतही यायला पाहिजे हे एक माणूस म्हणून त्यांना म्हणणं वेगळं, पण मी भाजपाचा राज्याचा अध्यक्ष आहे. त्या भूमिकेतून आज मनसे व भाजपा एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव नाही. असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.यावेळी त्यांनी युतीबाबत मोठे संकेतही दिलेत. मी चार दिवसांसाठी दिल्लीला जात आहो. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन राज ठाकरेंची नेमकी भूमिका पटवून सांगेन. भाजप-मनसे युतीबाबत चर्चाही केली जाईल. मात्र पक्ष नेतृत्व जो काही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल, अशी माहिती देत त्यांनी युतीबाबतचे संकेतही दिलेत.
दरम्यान,मनसेची परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलण्यात चंद्रकांत पाटील यशस्वी होणार का? राज्यात भाजप- मनसेचं सूत जुळणार? की परप्रांतियांबाबतचा मुद्दा स्वीकारुन भाजप मनसेसोबत युती करणार याबाबत जोरदार उत्सुकता आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 6, 2021, 2:50 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY