Breaking News

टोकियो ऑलिम्पिकमध्ये, कुस्तीच्या ५७ किलो वजनी गटात रवी दहियानं पटकावलं रौप्य पदक.

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 5, 2021 5:19 pm
|

टोकियो : टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळातील 57 किलो वजनी गटात भारतीय कुश्तीपटू रवी कुमार दहियानं रौप्य पदक पटकावलं .रशियन पैलवान झौर युगुएव्हने 7-4 अशा स्कोरने धोबीपछाड दिला . ऑलिम्पिक कुश्ती खेळात भारताचे हे सहावे पदक ठरले. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रवीचा दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जॉर उगुऐवकडून पराभव झाला. रवी आता रौप्य पदकासह भारतात परतणार आहे. उगुऐवने त्याला 3 गुणांनी पराभूत केले.खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांनी या खेळात भारताला पदक जिंकून दिले होते. साक्षी आणि योगेश्वर यांच्याकडे कांस्यपदके आहेत. विशेष म्हणजे सुशील कुमारने सलग दोनदा ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकले आहेत.

दरम्यान, रवीने उपांत्य फेरीत त्याने कझाकस्तानच्या नुरिस्लाम सानायेव्हला चीतपट करून अंतिम फेरी गाठली होती. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला. म्हणजे त्याने नूरिस्लामला सामन्यातूनच बाहेर फेकले होते. चौथा मानांकित रवी सानायेव्हविरुद्ध लढतीत 2-9 असा पिछाडीवर होता; परंतु रवीने हिमतीने मुसंडी मारत प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही पायांवर नियंत्रण मिळवत त्याला चीतपट करत फायनलमध्ये एंट्री घेतली. दरम्यान, यंदाच्या टोकियो खेळातील भारताचे हे एकूण पाच तर दुसरे रौप्य पदक ठरले आहे. यापूर्वी वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, पुरुष हॉकी टीम, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांनी ऑलिम्पिक खेळात भारताच्या पदक जमा केले होते. ऑलिम्पिक कुश्ती खेळात सुशील कुमारने देशासाठी सलग दोन पदके जिंकून दिली होती. सुशीलने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. खाशाबा जाधव ऑलिम्पिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारे भारताचे पहिला कुस्तीपटू होते. 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ही कामगिरी केली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 5, 2021, 5:19 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *