नितीन गडकरी यांच्याकडून महापूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्र, कोकणासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर

मुंबई :राज्यात आलेल्या महापूराने अनेक जिल्ह्यांमधील शहरं, गावांचा अतोनात नुकसान केले. प्रामुख्याने या पूराचा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना आणि कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना फटका बसला. या पूराचा फटका बसलेल्यांना मदत म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पश्चिम महाराष्ट्र (Paschim Maharashtra) आणि कोकणसाठी (Konkan) 100 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. नितीन गडकरी यांनी ट्विटर च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. गणेशोत्सव काळात मुंबईतून मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय कोकणाकडे जातात. मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराचा (Maharashtra Flood) फटका बसल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील अनेक ठिकाणी रस्ते खचले, पूल वाहून गेले तर महामार्गांचेही मोठे नुकसान झाले.
Immediate steps have been taken up to restore the roads affected by unprecedented rains in Konkan and Western Maharashtra. 100 Cr has been sanctioned in this regard. This includes 52 Cr for temporary restoration and 48 Cr for permanent restoration.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 5, 2021
प्राप्त माहितीनुसार, नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या एकूण निधीपैकी 48 कोटी रुपये हे कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी तर, उर्वरीत 52 कोटी रुपये हे तात्तपुरत्या आणि तातडीच्या दुरुस्तीसाठी खर्च केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.मुंबई-गोवा महामार्गावर असलेला चिपळूण जवळचा वशिष्टी नदीवरच्या पूलाची पावसामुळे दुरावस्ता झाली असल्याने हा पूल तातडीने दुरुस्त करुन 72 तासात वाहतुकीसाठी सुरु केला जाईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 5, 2021, 4:59 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY