राज्यपाल हे निष्ठावान आणि कतृत्ववान व्यक्ती :अमृता फडणवीस
मुंबई :राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यातील हातमाग प्रदर्शनाचं उदघाटन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड दौऱ्याला सरकारकडून विरोध होत असल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी भाष्य केले आहे.त्या म्हणाल्या की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे निष्ठावान आणि कतृत्ववान व्यक्ती आहेत. महाविकास आघाडीचे काही अंतर्गत राजकीय मुद्दे आहेत, ते पूर्ण होत नसल्याने त्यावरून ते राज्यपालांना लक्ष्य करत आहेत. पण असे व्हायला नको, असे फडणवीस म्हणाल्या
पुढे, फडणवीस यांनी पुण्यातील निर्बंधांबाबतही भाष्य केले. त्या म्हणाल्या पुण्यातील कोरोनाचा दर अतिशय खाली आला आहे. लोक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहे. राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांत कोरोना नियमात शिथिलता दिली. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला एक न्याय हे चुकीचे आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना निर्बंधामुळे कमी वेळेत जास्त गर्दी असून यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकार काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करत असताना पुण्यात काय अडचण आहे अस संतप्त सवाल ही त्यांनी यावेळी केला. सरकारवर दबाव आणण्यासाठी धरण आंदोलन करा असे त्यांनी उपस्थित लोकांना सांगितले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 5, 2021, 4:41 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY