भारतीय कुस्तीपटू रवी दहियाला प्रतिस्पर्ध्याचा कडकडीत चावा, फोटो पाहून अंगावर येईल शहारा
टोकियो: भारताला कुस्तीमध्ये निराशा येणार की काय असा प्रश्न पडला असताना कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेवचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. मात्र उपांत्य फेरीतील सामन्यादरम्यान रवीकुमार दहियाला प्रतिस्पर्ध्याने कडकडून चावा घेतला आहे.
रवी कुमार ची पकट ढील्ली करण्याचा प्रयत्न करत होता मात्र रवीकुमार जराही न डगमगता स्थिर राहिला या चावा घेतलेला व्रण पाहून एखाद्याच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळाच्या चुरशीच्या सेमीफायनल सामन्यात भारताच्या रवी कुमार दहियाने (Ravi Kumar Dahiya) 57 किलो वजनी गटाच्या फायनलचं तिकीट मिळवलं पण खेळाच्या शेवटच्या मिनिटादरम्यान, जेव्हा दहिया 5-9 ने पिछाडीवर होता, तेव्हा सामन्याच्या शेवटच्या क्षणी जेव्हा रवी दाहिया नुरिस्लाम सनायेव तुटून पडला होता, तेव्हा प्रतिस्पर्धी पैलवानाने अखिलाडूवृत्तीपणाचा कळसच केला. त्याने सामन्यादरम्यान भारतीय कुस्तीपटू रवी दहियाला कडकडीत चावा घेतला आहे. विशेष म्हणजे सामन्यादरम्यान ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही.
How unfair is this , couldn’t hit our #RaviDahiya ‘s spirit, so bit his hand. Disgraceful Kazakh looser Nurislam Sanayev.
Ghazab Ravi , bahut seena chaunda kiya aapne #Wrestling pic.twitter.com/KAVn1Akj7F— Virender Sehwag (@virendersehwag) August 4, 2021
दरम्यान, भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने या संपूर्ण घटनेला लज्जास्पद म्हणत कझाग पैलवानला लुजर म्हणून संबोधले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 5, 2021, 2:02 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY