Maharashtra Unlock : 25 जिल्ह्यातले निर्बंध शिथील ; राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली ; काय सुरु ? काय बंद ? येथे क्लिक करा
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चिन्ह दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) नुकतीच अनलॉकबाबतची नवी नियमावली जाहीर केली असून जवळपास 25 जिल्ह्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या नव्या नियमावलीनुसार, राज्यात सोमवार ते शनिवारपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्या ठिकाणी कोरोनाचे निर्बंध कायम असणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे, तेथे दुकाने आता रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील. यासंदर्भात सरकार लवकरच आदेश जारी करेल. तसेच कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ज्या ठिकाणी निर्बंध शिथिल केले जात नाहीत, तेथील नागरिकांनी सरकारला सहकार्य करण्याचे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी मुंबई लोकलबाबतही भाष्य केले आहे. पहिल्या टप्प्यात सर्व लोकांना मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देणे कठीण होईल. कारण, हळूहळू निर्बंध कमी केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोनाचे प्रकरणे वाढत आहे, त्या जिल्ह्यांत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर अशा 11 जिल्ह्यांचा समावेश आहे.
25 जिल्ह्यांमध्ये काय आहे ब्रेक द चेनची नवी नियमावली?
अत्यावशक गरजेची असलेली आणि नसलेली दुकानं तसंच शॉपिंग मॉल हे सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असतील. शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं आणि शॉपिंग मॉल सुरू ठेवण्यास मुभा. रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं आणि मॉल बंद राहणार.
सर्व सार्वजनिक उद्यानं, खेळाची मैदानं या ठिकाणी व्यायाम, सायकलिंग, वॉकिंग करण्यास मुभा
सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा, यामध्ये एकाच शिफ्टला गर्दी न करता दोन शिफ्टमध्ये विभागणी करून बोलवण्यात यावं
वर्क फ्रॉम होमवर भर दिला तरीही चालणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आलं आहे
शेतीविषयक सगळी कामं, सिव्हिल वर्क, इंडिस्ट्रिय अॅक्टिव्हिटी, माल वाहतूक पूर्ण क्षमतेने करण्यास मुभा
योगा सेंटर, जिम, हेअर कटिंग सलून, स्पा 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवारी रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा, शनिवारीप दुपारी 3 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा. रविवारी ही सगळी दुकानं बंद राहणार
सिनेमा थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार
सगळी धार्मिक स्थळं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार
सगळी रेस्तराँ 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा. कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं सक्तीचं. पार्सल सर्व्हिस आत्ता सुरू आहे तशी सुरू राहणार
सगळ्या जिल्ह्यांमध्ये रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत निर्बंध असणार आहेत
वाढदिवस, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चे या सगळ्यांना मर्यादित स्वरूपात लोकांची उपस्थिती आवश्यक कोव्हिड प्रोटोकॉलचे सगळे नियम पाळणं आवश्यक
मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग हे सगळं पाळणं आवश्यक आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 2, 2021, 10:32 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY