Breaking News

… अन्यथा जिथे फलक दिसेल तिथे तोडफोड;संतप्त शिवसैनिकांचा इशारा, मुंबई विमानतळ परिसरात तणावाचं वातावरण (Watch Video)

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 2, 2021 5:00 pm
|

मुंबईः मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या विमानतळाचे कामकाज आता अदानी समूहाच्या हातात गेले आहे. त्यानंतर विमानतळाबाहेर ‘अदानी विमानतळ’ असे फलक लावण्यात आल्याने शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे.एखाद्या उद्योगपतीच्या नावे विमानतळ ओळखलं जाणार असेल तर ते मान्य नाही, ते महाराजांच्या नावानेच ओळखलं जावं, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. जीव्हीकेप्रमाणेच (मॅनेज्ड बाय अदानी एअरपोर्ट) अदानी कंपनीनं देखील फलक लावाला, अशी मागणी यावेळी शिवसेनेनं केली. अन्यथा जिथे फलक दिसेल तिथे तोडफोड, करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

संतप्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर लावलेल्या ‘अदानी विमानतळा’च्या (Adani Airport) फलकाचे शिवसैनिकांनी विरोध केला आणि बोर्ड काढून टाकला.मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. मुंबई विमानतळाचा ताबा मिळताच विमानतळावर व बाहेर अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत.दरम्यान, शिवसेनेचा आरोप आहे की पूर्वी हे विमानतळ ‘छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ’ म्हणून ओळखले जात होते, परंतु आता येथे अदानी विमानतळाचा बोर्ड लावण्यात आला आहे. ही गोष्ट ते सहन करू शकणार नाहीत. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर तोडफोड केली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 2, 2021, 5:00 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *