पेगॅसस प्रकरण म्हणजे देशद्रोह! “या” हेरगिरी प्रकरणावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे- राहुल गांधी आक्रमक
नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरुन (Pegasus Scandal) देशात आणि जगभर गाजत असलेल्या पेगॅसस प्रकरणावरून काँग्रेस आणि समविचारी पक्ष सरकारची संसदेच्या दोन्ही सभागृहात कोंडी करत आहेत. यावरून विरोधी पक्षाने आज संसदेत आक्रमक भूमिका घेतली . संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात या प्रकरणाचे पडसाद जोरदार उमटले.
दोन्ही सभागृहात विरोधकांनी पेगॅसस प्रकरणावरुन चर्चेची मागणी केली. सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे विरोधकांनी सभागृहात कामकाज बंद पाडले. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह सर्व विरोधकांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पेगॅसस प्रकरण म्हणजे देशद्रोह आहे. पेगॅससच्या रुपात पंतप्रधानांनी भारतीय नागरिकांच्या मोबाईलमध्ये शस्त्र सोडले आहे. केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागमी राहुल गांधी यांनी या वेळी केली.
राहुल म्हणाले- आमचा फक्त एकच प्रश्न आहे. भारत सरकारने पेगासस विकत घेतले का, हो किंवा नाही? भारत सरकारने पेगासस शस्त्राचा आपल्या लोकांवर वापर केला?हो किंवा नाही? आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे. सरकारने म्हटले आहे की संसदेत पेगाससवर कोणतीही चर्चा होणार नाही. स्पष्टपणे सरकारने काहीतरी चुकीचे केले आहे, सरकारने असे काहीतरी केले जे देशासाठी धोकादायक आहे. अन्यथा त्यांनी चर्चा करायचे सांगितले असते .राहुल यांनी प्रश्न उपस्थित केला- मला देशातील तरुणांकडून जाणून घ्यायचे आहे की, नरेंद्र मोदींनी तुमच्या मोबाइलवर एक शस्त्र टाकले आहे. हे शस्त्र माझ्या विरोधात, सर्वोच्च न्यायालयाविरोधात, पत्रकारांच्या विरोधात, कार्यकर्त्यांविरूद्ध वापरले गेले. मग हे काय कारण आहे की यावर सभागृहात चर्चा होत नाही.
नरेंद्र मोदी जी आणि अमित शाह जी यांनी देशाच्या आत्म्याला दुखावले आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की सरकारने याचा वापर केला का? आणि कोणाकोणाविरोधात याचा वापर केला?अतिरेकी आणि देशद्रोही यांच्याविरूद्ध जे शस्त्र वापरायला हवे, नरेंद्र मोदींनी ते भारतीय संस्था आणि लोकशाहीविरूद्ध का वापरले? असे राहुल गांधी यांनी सरकारला सुनावले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 28, 2021, 4:35 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY