केंद्रातील मंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा; वाजत गाजत स्वागत करू: शिवसेनेचा घणाघात
मुंबई : . आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात हाहाकार उडाला. रायगड, रत्नागिरी व साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळल्या, भूस्खलन झाले तसेच इतर दुर्घटना घडल्या. तळिये-चिपळून, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी आणि नांदेडपर्यंत जलप्रलयाने नुकसान केले. प्रत्येक घरात मदत पोहोचवण्यासाठी ठाकरे सरकारला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. याच पाश्वभूमीवर केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील काही मंत्री आहेत. त्यांनी काही घोषणा केल्याचे मी ऐकतो आहे. त्यांनी आता पुरग्रस्ताच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेला २ हजार कोटींचा चेक घेऊन यावा.एखादा, जर तो त्यांनी आणला तर नक्की आम्ही त्यांचे वाजत गाजत स्वागत करू आणि कोकण आणि सातारा सांगलीच्या जनतेला सुपूर्त करू, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठणकावले आहे .
राज्यातील पूर परिस्थिती, दौरे आणि मदतकार्य या मुद्यावर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र आपला आहे, कोकण आपला आहे, सातारा, सांगलीतील माणसे आपली आहेत, प्रत्येकाला असं वाटतंय की आपण मदत करावी. आपण त्यातून काही लोकांचा बचाव करू शकलो तर करावा, ही काही श्रेयाची लढाई नाही, हा श्रेयवाद नाही, जर कोणाला असे वाटत असेल तर ते माणुसकीशून्य काम करत आहेत. महाराष्ट्र सरकार सक्षम आहे. आपल्या जनतेला सर्व प्रकारचे सहाय्य आणि मदत करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिले आहेत. पण केंद्राची जबाबदारी आहे. महाराष्ट्र केंद्राला विशेषतः मुंबई सर्वाधिक कर देते. आम्ही काय आता हिशोब मागायला बसलो नाही. पण केंद्र आमचा बाप आहे, महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहे,जगभरात ज्या वेळी अशा प्रकारच्या घटना होतात त्यावेळी बचावकार्यात अडथळे येऊ नयेत हा नियम आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर अशा काही घटना घडतात तेव्हा शक्यतो आरोप-प्रत्यारोप करणे, राजकीय दौरे करणे, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवर आरोप करणे, हल्ले करणे हे थांबले पाहिजे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 27, 2021, 3:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY