अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात दुर्घटनाग्रस्त तळीये गावी
मुंबई, : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत असून दुपारी दीडच्या दरम्यान ते दुर्घटनाग्रस्त तळीये गावी पोहचून पाहणी करतील. आज सकाळी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती व मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली.
बाधित जिल्हे : एकूण ९
कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे
एकूण बाधित गावे : ८९०
एकूण मृत्यू : ७६
हरविलेल्या व्यक्ती : ५९
जखमी व्यक्ती : ३८
पूर्ण नुकसान झालेली घरे: १६
अंशतः: नुकसान झालेली घरे: ६
प्राण्यांचे मृत्यू : ७५
सुरक्षित स्थळी हलविलेल्या व्यक्ती: ९० हजार
मदत छावण्या : ४
निवारा केंद्रे : रत्नागिरी ६ ( २ हजार लोक)
सुविधांचे नुकसान : चिपळूण येथे वशिष्टी नदीवरील पूल खचला
लष्कर, एनडीआरएफ सहाय्य
· एनडीआरएफच्या एकूण २५ तुकड्या ;
(मुंबई २, पालघर १, ठाणे २, रायगड १, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग २, सांगली २, सातारा ३. कोल्हापूर ४, पुणे २ )
· भुवनेश्वरहून मागविल्या ८ तुकड्या –
या कोल्हापूर २, सातारा १, सांगली २ इथे तैनात केल्या जातील, तसेच २ तुकड्या पुणे येथे राखीव असतील.
· तटरक्षक दलाच्या ३ , नौदलाच्या ७, लष्कराच्या ३ तुकड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथे
· एसडीआरएफच्या नागपूरसाठी २ आणि या रायगड जिल्ह्यासाठी २ अशा ४ तुकड्या
· बोटी : ५९ ( ४८ एनडीआरएफ आणि ११ एसडीआरएफ)
महाड येथील परिस्थिती :
अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी वाढून महाड आणि पोलादपूर येथे पूर आला.
सावित्री नदीवरील पूल मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्याने बचाव पथकांना वेळीच पोहोचणे अवघड झाले.
एनडीआरएफच्या जवानांना हवाईमार्गे दुर्घटनास्थळी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सुरुवातीला अतिशय खराब हवामानामुळे ते उतरू शकले नाहीत, मात्र नंतर त्यांनी बचाव कार्य सुरु केले आणि माणगाव येथे बचाव केंद्रे सुरु करण्यात आली.
३ ठिकाणी दरडी कोसळल्या
तळीये मधलीवाडी (ता. महाड)
साखरसुतारवाडी
केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर)
२ कोटी रुपये निधी
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपये देण्यात आले असून पाउस आणि पाणी ओसरल्याने मदत कार्यास वेग देण्यात आला आहे.
१००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 24, 2021, 1:43 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY