करोनाची तिसरी लाट कधी येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं केलं विधान ,म्हणाले…
मुंबई: करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) धोका कायम असल्याचा अंदाज तज्ञांकडून वारंवार व्यक्त केला जात आहे.. त्यामुळं अनेक गोष्टींवरचे निर्बंध ‘जैसे थे’ असून लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. धोका नसेल तर निर्बंध उठवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड-19 तिसरी लाट, लसीकरण, मुंबई लोकलसेवा, निर्बंध शिथिलीकरण या सर्व प्रश्नांवर महत्त्वाचं विधान केलं आहे.
तिसरी लाट येऊ शकते पण केव्हा येईल, हे खरंतर आपल्यावर आहे. आपण जर निर्बंध, कोरोना नियम पाळले तर आपल्याला नक्कीच तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. त्याचबरोबर लसीकरण हा अगदी रामबाण उपाय आहे. त्यामुळे इन्फेक्शन कमी होतं आणि झालं जरी ते अत्यंत सौम्य स्वरुपाचं असतं.लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी व त्यांच्यावरील अन्य निर्बंध उठवावेत, अशी एक मागणी होत आहे. त्याबाबत विचारलं असता, राज्य सरकारच्या पातळीवरही याबाबत चर्चा सुरू असल्याचं टोपे म्हणाले. एक-दोन महिन्यात संपूर्ण राज्याचं लसीकरण करण्याची क्षमता सरकारची आहे. मात्र त्याप्रमाणत लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे लसपुरवठ्याची मेहरबानी केंद्राने केली तर राज्याचं सर्वात मोठं काम होईल. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून महाराष्ट्र ICMR ने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतोय. ICMR ने सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला प्रोटोकॉल द्यावे. निर्बंध शिथलीकरणाबाबत सूचना द्यावात. कारण अलिकडेच आलेल्या केंद्राच्या टीमने निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांनी दिलेल्या सूचनांनुसारच काम करत आहोत.
लोकलच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता प्रत्येक प्रवाशाला थांबवून त्यांच्याकडील लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी करता येईल का? रेल्वेकडं तितकं मनुष्यबळ आहे का? हे प्रश्न आहेत. त्यामुळं अद्याप काही निर्णय झालेले नाहीत. मात्र, दोन लस झालेल्यांवरील काही निर्बंध शिथील करायला हवेत, याबाबत कुणाचंही दुमत नाही. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कोविड टास्क फोर्स लवकरच या संदर्भात निर्णय घेतील, असं टोपे यांनी सांगितलं. जनतेने या निर्बंधांचा गैरअर्थ लावू नये. कारण तिसरी लाट आली आणि त्यात अधिक संसर्ग झाला तर त्याचीही जबाबदारी सरकारवर आहे. या सगळ्याचा विचार करुनच निर्बंध लागू करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 21, 2021, 8:11 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY