Breaking News

लसीचे दोन्हीही डोस पूर्ण झालेल्यांना निर्बंधांमधून सूट दिली जावी , मुख्यमंत्र्यांशी करणार उपमुख्यमंत्री चर्चा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 21, 2021 6:25 pm
|

राज्यात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत आली आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) धोका कायम असल्याचा अंदाज तज्ञांकडून वारंवार व्यक्त केला जात आहे. लसीकरण सुरु असल्याने लस घेतलेल्यांना निर्बंधात सूट द्यावी, असाही सूर नागरिकांचा आहे. दरम्यान, गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश आहेत. पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधताना याविषयावर भाष्य केले आहे.

अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले गेले पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी देण्यात आली पाहिजे, असे माझे वयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे’ असे अजित पवार म्हणाले आहेत. यामुळे आता लसीकरण पूर्ण झालेल्यांना निर्बंधांमधून सूट दिली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘प्रत्येकाची मते ही वेगवेगळी आहेत. काही जणांना वाटते की, पुढचे 100 ते 120 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले गेले पाहिजे. मात्र अनेक ठिकाणी लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत. अशी बेफिकिरी योग्य नाही’ असेही पवार म्हणाले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 21, 2021, 6:25 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *