मुंबईसह ‘या’ ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट, वाचा तुमच्या शहरात आज पाऊस आहे का?
मुंबई, आज सकाळपासूनच मुंबईत (Mumbai) रिमझिम पाऊस (Light Rain) सुरू आहे. आज दुपारी 4 नंतर मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसाठी अति महत्त्वाचे असणार आहेत. उद्या सकाळी साडे आठ वाजेपर्यंत मुंबईतील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज मुंबईसह राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे. IMD ने आज मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार आहे. तसेच वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे.याशिवाय आज कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे
Severe weather warnings over the region during next 5 days. Kindly visit https://t.co/89p4H3QwEY… for detailed district wise forecast and warnings. pic.twitter.com/1QjQQAdpOH
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 21, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 21, 2021, 3:35 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY