Breaking News

ठाण्यात १५ डान्स बारना ठोकले सील; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 21, 2021 3:09 pm
|

ठाणे : सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत १५ लेडीजबारवर सील केले. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे.

साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ तसेच आपत्ती व्यवस्था कायदा २००५ च्या साथरोग सर्व संबंधित तरतुदीनुसार शासनाने कोविड-१९ आजाराचा प्रसार रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या त्रिसुत्रीचे पालन करणे, सर्व बार अँण्ड रेस्टॉरंट, लेडिज बार व इतर सोमवार ते शुक्रवार ५० टक्के बैठक क्षमतेने सायं ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे तसेच सायं ४ वा.नंतर व शनिवार आणि रविवार फक्त टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सेवा सुरु ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले असून या नियमांचे उल्लंघन केलेल्या १५ आस्थापना महापालिकेने आज सील केल्या.

या कारवाईतंर्गत ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अ‍ॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील अ‍ॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण १५ लेडीजबार सील करण्यात आले.

सदरच्या सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर, प्रणाली घोंगे, शंकर पाटोळे आणि विजयकुमार जाधव यांनी यांनी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केल्या.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 21, 2021, 3:09 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *