Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले दोन अपघातग्रस्त तरुणांचे प्राण

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 20, 2021 8:03 pm
|

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल – रुक्‍मिणीची शासकीय महापूजा (Mahapuja pandharpur-temple) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांचे निवासस्थान मातोश्रीवरून पंढरपूरकडे रवाना झाले . त्यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरच्या जवळपास पोहचले . खराब हवामान आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रस्ते मार्गानेच पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला.

स्वत: आठ तास गाडी चालवून पंढरपूरला पोचल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांसोबत विकासकामांची आढावा बैठक घेतली. यासाठी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका कामगिरीने सर्वांचे मन जिंकली आहेत. प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा पंढरपूरच्या पंचक्रोषीमध्ये असणाऱ्या करंबक गावाजवळ आला. त्यावेळी या गावाजवळ दोन दुचाकीस्वरांचा अपघात झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांची एक वाहन आणि रुगणवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. रुग्णवाहिका वेळेवर मिळाल्याने दोन्ही तरूणांचे प्राण वाचले आहेत.

नीलम गोऱ्हे यांचे ट्वीट-

तसेच शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील मुख्यमंत्री असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या कामगिरीचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतूक होत आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 20, 2021, 8:03 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *