Breaking News

अखेर पालघरमध्ये भाजपची सत्ता गेली, महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेवर फडकला झेंडा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 20, 2021 7:03 pm
|

पालघर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अखेर शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीने (NCP) बाजी मारत भाजपचे (BJP) सत्तास्थापनेचे मनसुबे उधळून लावले आहेत . आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी शिवसेनेच्या सौ वैदेही वाढान तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री.ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली..

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, गृहनिर्माण मंत्री.डॅा.जितेंद्रआव्हाड व शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या..

यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार सुनिल भुसारा, आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले यांच्या सहीत मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे निलेश सांबरे (Nilesh Sambre) आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनिल भुसारा (Sunil Bhusara) यांच्या दोन गटांत वाद निर्माण झाला होता. या दोन्ही गटाने तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तूफान राडा केला होता. पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करत शेवटी येथील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील वाद मिटवला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 20, 2021, 7:03 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *